Sat, Oct 31, 2020 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्काराच्या आरोपाबाबत संदिग्धता असतानाही अटक झाल्यास प्रचंड नुकसान !

बलात्काराच्या आरोपाबाबत संदिग्धता असतानाही अटक झाल्यास प्रचंड नुकसान !

Last Updated: Oct 18 2020 7:01PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात करण्यात आलेले आरोप हे खोटे असल्याचे सिध्द झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक झाली तर त्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान होऊ शकते. असे स्पष्ट मत व्यक्त उच्च न्यायालयाने विनयभंगाचा आरोप असलेल्या एका व्यक्तीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

एका कार्यालयात सहाय्यक म्हणून कार्यरत असललेल्या पीडित महिलेने आपल्या वरिष्ट अधिकार्‍याने ऑफिसमध्ये विनयभंग केल्याचा आरोप केला. संबधित महिलेने दुसर्‍या दिवशी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या प्रकरणी अटकेची शक्यता असल्याने त्या अधिकार्‍यांनीने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्त्यांने बलात्काराचा आरोप फटाळून लावला. पीडित महिलेने दुपारी दोन वाजता हा प्रकार घडल्याची तक्रार केली. मात्र त्यानंतरही महिलेने सायंकाळपर्यंत काम सुरूच ठेवले व दुसर्‍या दिवशी तक्रार दाखल केली. हा प्रकार घडल्यानंतर याचिकाकर्त्याने तिच्यावर कोणतीही जबरदस्ती त्यावेळी केली नाही. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

न्यायालयाने याची दखल घेतली. पीडित महिलेने घटना घडल्यानंतर ऑफिसमधून तात्काळ घरी न जाता सायंकाळ पर्यंत काम करत थांबली. शिवाय झालेल्या कोणाला याबद्दल तक्रारही तिने केली नाही. हा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद नाकारता येणार नाही.हा गुन्हा कलम ३५४ नुसार घडला या विषयी अद्यापही संदिग्धता आहे. असे असताना याचिकाकर्त्यांचा जामीन  नाकारल्यास त्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान होऊ शकते. असे स्पष्ट करत न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

 "