Thu, Aug 13, 2020 17:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा इशारा 

मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा इशारा 

Last Updated: Jul 06 2020 11:34AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशात मध्य प्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या २४ तासात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोव्यातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि छत्तीसगडमध्येही येत्या दोन दिवसांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, मान्सूनच्या सक्रिय स्थितीमुळे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात येत आहे. याशिवाय मुंबई आणि कोकण जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलेला आहे. 

अरबी समुद्रातील दाबामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातही पावसाचा जोर कायम असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. महाराष्ट्राच्या मुंबई येथे सतत जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तसेच मुंबईतील कामावर जाणाऱ्या कामगारांनाही त्रास सहन करावा लागत आहे.  अनेक सखल भागातील पाणी काढण्याचा प्रयत्न महापालिकेचे कर्मचारी करत आहेत.