Tue, Aug 04, 2020 13:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत मुसळधार पाऊस, वाहतूक ठप्प (video)

मुंबईत मुसळधार पाऊस, वाहतूक ठप्प (Video)

Last Updated: Jul 03 2020 1:44PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान  मुसळधार पाऊस पडल्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यामुळे बेस्ट बससह अनेक वाहने अडकली. ग्रॅण्टरोड व मलबार हिल या भागात सर्वाधिक ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकणला झोडपून काढणाऱ्या पावसाने आता मुंबईतही हजेरी लावली आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गासह शहरी भागातील रस्ते वाहतूक कोंडीत सापडले आहेत. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत ग्रँटरोड ५३ मिमी, मलबार हिल ५२ मिमी, मेमनवाडा ४६ मिमी, एस डब्ल्यू वर्कशॉप दादर ४३ मिमी, चंदनवाडी गिरगाव ४१ मिमी, डोंगरी ४० मिमी, दादर व भायखळा अग्निशमन दल ३६ मिमी, पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिम ३९ मिमी, सांताक्रुझ ३८ मिमी, विलेपार्ले ३७ मिमी आणि पूर्व उपनगरात कुर्ला १८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. 

भुलाबाई देसाई रोड, बंडू महादेव जंक्शन, वरळी नाका, हिंदमाता जंक्शन, धोबीघाट, कप परेड, चिराबाजार, सीपी टँक, भायखळा पोलिस स्टेशन आदी ठिकाणी पाणी तुंबले आहे. गोल देऊळ ते सरदार वल्लभाई पटेल रोड पर्यंत बेस्टच्या बस अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.