Sat, Oct 24, 2020 22:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नौदलाचा शिपायाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

नौदलाचा शिपायाने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या

Last Updated: Oct 19 2020 12:01AM
घाटकोपर : पुढारी ऑनलाईन

घाटकोपर येथील नौदलाच्या मटेरीयल ऑर्गनायजेशनमध्ये कार्यरत नौदलाचा शिपायाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना रविवार (दि. १८) रोजी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान घडली आहे. रायपाल पाल सिंग(४५) मूळ अमरगढ पंजाबचे ते रहिवासी होते.

घाटकोपर येथील नौदलाच्या मटेरियल ऑर्गनायजेश मध्ये काम करीत असताना अचानक या शिपायाने त्याच्याकडे असलेली सर्व्हिस इंसास रायफलने पोटात आणि छातीत अश्या दोन गोळ्या झाडून घेतल्या. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ सातचे उपायुक्त प्रशांत कदम सह घाटकोपर पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह आणि रायफल ताब्यात घेतली आणि शवविच्छेदन साठी मृतदेह राजावाडी शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे.या शिपाई ने आत्महत्या का केली? या कारणाचा नौदल पोलिस आणि घाटकोपर पोलिस ही शोध घेत आहेत.

 "