‘नागरिकत्वा’चे मुंबईतही पडसाद

Last Updated: Dec 15 2019 1:35AM
Responsive image


मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय नागरिकत्व कायदा (कॅब) विधेयक व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)  केंद्रातील भाजप सरकारने त्वरित रद्द करावी या मागणीसाठी पूूर्वोत्तर राज्यांत तीव्र विरोध होत असून, त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. शनिवारी समाजवादी पार्टीतर्फे आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले, तसेच तर मरिन ड्राईव्ह येथे आंदोलनासाठी जमणार्‍या 46 जणांना ताब्यात घेण्यात आले. यात माजी आयएएस अधिकारी कन्‍नान गोपीनाथन यांचाही समावेश आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या असामी विद्यार्थ्यांनीही आंदोलन केले.

मुंबईत आसामच्या विद्यार्थ्यांचा विरोध

राष्ट्रीय नागरिकत्व कायदा विधेयकाला (कॅब) विरोध करण्यासाठी मुंबईत स्थायिक असलेल्या आसाम नागरिकांनी आझाद मैदानात आंदोलन केले.  हे विधेयक रद्द करावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली-

विधेयकास आसामच्या सर्वच नागरिकांचा विरोध आहे.  त्याचबरोबर  नॅशनल रजिस्टेशन ऑफ सिटीजन (एनआरसी)  सध्या आसाममध्ये राबवण्यात आले आहे. एनआरसीमुळे सुरुवातीला 70  लाख लोकांना आसाममध्ये नागरिकत्व सिद्ध करता आले नव्हते.एनआरसीची प्रक्रिया पारदर्शक नाही, असा आरोप आंदोनकर्त्यांनी केला आहे.

आझाद मैदानात समाजवादी पार्टीचे धरणे आंदोलन

केंद्रातील भाजप सरकारने कॅब व एनआरसी त्वरित रद्द करावी अन्यथा समाजवादी पार्टीतर्फे महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करु असा इशारा प्रदेशाध्यक्ष  व आमदार अबु आझमी यांनी दिला आहे. समाजवादी पार्टीतर्फे आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. त्यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या घरात घूसू व त्यांना पळवून लावू’ असा इशारा आझमी यांनी दिला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनस्थळी गर्दी केली होती. केंद्रसरकारने कॅब विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजूर केले. या विरोधात देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. विशेषत : धर्मनिरपेक्ष मानल्या जाणार्‍या पक्षांकडून याला तीव- विरोध होत आहे. माजवादी पार्टीने केलेल्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यासह राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांची बंदोबस्तासाठी तैनात होत्या. सुमारे तीन तास धरणे आंदोलन केले. आंदोलनस्थळी याला समाजातील विविध घटकांनी ही पाठिंबा दर्शविला.

आमदार अबुु आझमी म्हणाले,  केंद्राने हे  विधेयक मागे घ्यावे. आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. आम्ही केंद्रसरकार पुढे वाकणार नाही, त्यांना आम्ही वाकवणार. आजही महाराष्ट्रात  हिंदू -मुसलमान गुण्यागोविंदाने एकत्र आहेत. आमची काही भांडणे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो. त्यांच्या  सैन्यात बहुतांश : हे मुसलमान होते.  याचबरोबर सोमवारी  नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ’महाविकास’आघाडी सरकारला हे विधेयक महाराष्ट्रात लागू करु, नका अशी विनंती करण्यात येणार आहे.

सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन


कृषी विधेयक रद्द करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगलीत निदर्शने


सलमानचा आवाज एस. पी. बालसुब्रमण्यम


बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, कोरोना रुग्णांनाही करता येणार मतदान


मुंबई : मराठा आरक्षणासाठी पनवेलमध्ये ठिय्या आंदोलनाला सुरूवात


प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन


कामगार कायद्यातील दुरुस्तीचा पहिला फटका; नाशिकमध्ये २० कामगारांना नोकरीवरुन काढलं!


औरंगाबाद : आयशर टेम्पोमधून चोरट्यांनी केली दीड लाखांची चोरी, राष्ट्रीय महामार्गावरील घटना  


सोने खरेदीची सुवर्ण संधी; दरात मोठी घसरण


दीपिकासोबत चौकशीवेळी हजर राहण्याची रणवीरची एनसीबीकडे विनंती