मुंबई : पुढारी ऑनलाईन
आज आपण 21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. आजच्या युगात तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असं असलं तरी आजच्या युगातही नाते-संबंधांनाही तितकेच महत्त्व आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
तंत्रज्ञानाच्या युगात तसे पाहिले तर मित्रांची संख्या कमी असली तरी व्हर्चुअल जीवनात मित्रांची संख्या कमी नसते. इंटरनेटच्या माध्यमातून आपण दररोज एक नवीन मित्र बनवत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणास कधीही आणि केव्हाही नवीन मित्र बनवता येतात. पण ही मैत्री ज्याप्रमाणे वरदान आहे त्याच्यप्रमाणे शाप पण ठरु शकते. यासाठी सावधान राहण्याची गरज आहे.
१. अवलंबून राहणे
आज बरेचजण मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी सोशल मीडियाचा अवलंब करताना दिसतात. या गोष्टींचे तुम्हाला व्यसन लागू शकते. फेसबुक फ्रेंड ऑनलाईन नसेल तर काहीजण निराश होतात. यासाठी मित्रासोबत गप्पा मारण्यासाठी सोशल मीडियावर अवलंबून राहू नका.
२. वैयक्तीक आयुष्य
कायमस्वरुपी सोशल मीडियावर ऑनलाईन राहण्याचा परिणाम वैयक्तीक आयुष्यावर होत असतो. घरात बसून व्हर्चुअल मित्रांना हाय, हॅलो करतो मात्र त्याच्यवेळी आपल्या कुटुंबासोबत संवाद साधण्याचे विसरुन जातो. यासाठी स्वत:साठी तसेच कुटुंबासोबत जास्ती जास्त वेळ घालवा.
३. आरोग्य
फेसबुक किेवा इंटरनेट मैत्रीचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते. चॅटींग कराताना जास्तीत जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. चँटीग करताना तान्ह भूक याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा तब्येतीवर परिणाम होत असतो. इंटरनेटच्या माध्यमातून बनविलेला मित्राच्या खर्या आयुष्याबद्दल अंदाज बांधता येत नाही. यामूळे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
४. वैयक्तीक माहिती
इंटरनेटच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या मित्राला वैयक्तिक माहिती दिल्यामुळे आपण अडचणीत येवू शकतो. वैयक्तीक माहितीच्या गैरवापर होउ शकतो. यासाठी अशा मित्रासोबत लांब राहणेच चांगले.
५. शेअरिंग
एखाद्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे चूकीचे आहे. काहीवेळा आपण एखाद्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवतो आणि आपले वैयक्तीक फोटो, माहिती शेयर करतो. या फोटोचा वापर करुन फसविण्याची शक्यता असते. तसेच सोशल मीडियावर फोन नंबर, पत्ता, वैयक्तिक माहिती देणे टाळा.