Mon, Aug 10, 2020 08:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन 

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन 

Last Updated: Jul 16 2020 9:39AM

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनाराणमुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे गुरुवारी कोरोनाने निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

वाचा : मुंबईत पावसाने चोवीस तासांत दोन इमारती कोसळल्या

नीला सत्यनारायण यांचा जन्म मुंबईत ५ फेब्रुवारी १९४९ रोजी झाला होता. त्या १९७२ च्या बॅचच्या  सनदी (आयएएस) अधिकारी होत्या. भारतीय प्रशासन सेवेतून निवृत्त झाल्यावर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. निवडणुकावर  सरकारी तिजोरीतून होणारा वारेमाप खर्च पाहून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात यासाठी त्या आग्रही होत्या. त्यासाठी त्यांनी तत्कालीन सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता. मराठी साहित्यिक असलेल्या सत्यनारायण यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.

नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

वाचा : ठाण्यात १९८१ तर मुंबईत १३९० कोरोनाचे नवे रुग्ण