Sun, Sep 27, 2020 03:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #CycloneNisarga मुंबई : सर्व विमानांची उड्डाणे रद्द

#CycloneNisarga मुंबई : सर्व विमानांची उड्डाणे रद्द

Last Updated: Jun 03 2020 9:25AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

मुंबई आणि कोकण किनारपट्टीला आज बुधवारी ३ जून रोजी 'निसर्ग' चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. विमानतळावर ११ विमाने उड्डाण घेणार तर मुंबईत ८ येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. बुधवारी एअर एशिया इंडिया, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईस जेट या कंपन्यामार्फत विमानसेवा दिली जाणार आहे. 

तडाखा 'निसर्ग' Live : चक्रीवादळ दुपारी 1 पर्यंत अलिबागला धडकणार

ट्रेनच्या मार्गात बदल

वादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही रेल्वे गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला.

०२६१७ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन स्पेशल ट्रेन मडगाव-लोढा-मिरज-पुणे-मनमाडमार्गे

०६३४६ तिरुअनंतपुरम-एलटीटी एक्स्प्रेस मडगाव-लोढा-मिरज-पुणे-कल्याणमार्गे 

०२४३२ नवी दिल्ली- तिरुअनंतपुरम स्पेशल ट्रेन सुरत-वसई रोड-कल्याण-मिरज-लोढा-मडगाव मार्गे चालविण्यात येणार 

०६३४५ एलटीटी-तिरुअनंतपुरम एक्स्प्रेस बुधवारी संध्याकाळी ६ वाजता चालविण्यात येणार.

 "