Sun, Sep 20, 2020 06:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात हॉस्पिटलला आग, बाधितांना इतर हलवले

ठाण्यात हॉस्पिटलला आग, बाधितांना इतर हलवले

Last Updated: Aug 12 2020 12:56AM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाण्यातील वाघबीळ परिसरातील असलेल्या दिया मेडिकलला रात्री ११ च्या सुमारास आग लागली. सदरचे मेडिकल हे दिया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे असून या हॉस्पिटलमध्ये ४ कोरोना रुग्ण हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. आग लागल्यानंतर त्यांना तात्काळ इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. सुदैवाने या प्रकारात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. पाच रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रुग्णांना हलवण्यात आले होते. 

आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहिती नुसार साधारणतः छोटी आग ही सर्वात आधी मेडिकलला लागली. त्यानंतर ११ वाजून ५ मिनिटांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल आला. त्यानंतर तात्काळ पालिकेची टीम फायर इंजिन आणि तात्काळ दखल घेत वाहन घटनास्थळी पोहोचले. आणि आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 "