Fri, May 07, 2021 18:26
एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या कंगना राणावत-तापसी पन्नूच्या वादावर पडदा? 

Last Updated: Apr 10 2021 6:13PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अनेकांसोबत पंगा घेणारी बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत आणि तापसी पन्नू यांच्यात दिलजमाई झालेली दिसते. कारण, दोघींचा ट्विटरवरील शाब्दिक वॉर सर्वांनाचं माहित आहे. या ना त्या कारणाने त्या दोघी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात. एखाद्या मुद्द्यावरून कंगना-तापसी टीका करताना दिसतात. यादरम्यान, आता एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तापसी पन्नू ही कंगना राणावतला धन्यवाद देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, कंगनाने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय प्रकरण आहे पाहा-  

हरहुन्नरी अभिनेत्री तापसीला 'थप्पड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार (२०२१) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर, तापसीने व्यासपीठावरून एक भाषण केलं. यामध्ये ती आभार मानते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्य़ा शर्यतीत तापसीसोबत विद्या बालन, दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर यांच्यासह कंगना राणावत होती. त्यामुळे हा पुरस्कार जिंकल्यानंतर तापसीने कंगना राणावतचे आभार मानले. तसेच इतर अभिनेत्रींचेदेखील आभार मानले आहेत.

May be a Twitter screenshot of one or more people and text that says "0:01 98.3K views 63 t 307 3K Kangana Ranaut @KanganaTeam Apr 9 Thank you @taapsee well deserved Vimal elaichi filmfare award.... no one deserves it more than you 602 t 1.5K 11.2K Replies"

तापसी पन्नूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कंगनाने प्रतिक्रिया दिली ती म्हणाली, 'थँक यू तापसी, तू फिल्मफेअर पुरस्कारासाठी पात्र आहेस. तुझ्यापेक्षा कोणीही या पुरस्कारासाठी पात्र नाही.'