Tue, Aug 11, 2020 22:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकनाथ खडसेंच्‍या भेटीगाठीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्‍हणाले...

एकनाथ खडसेंच्‍या भेटीगाठीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्‍हणाले...

Last Updated: Dec 10 2019 9:22AM

शिवसेना नेते एकनाथ शिंदे व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेमुंबई : पुढारी ऑनलाईन  

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी सध्या सर्वांच्‍या चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांनी काल दिल्‍लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात कुणीही कुणालाही भेटू शकते व याचा वेगळा अर्थ काढू नये, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे  म्‍हणाले की, कुणी कुणाला भेटावे यावर बंदी नाही. एकनाथ खडसे सर्वांचे मित्र आहेत. शिवसेना-भाजपची युती असताना त्यांनी अनेक नेत्यांसोबत एकत्र काम केले आहे. गेल्या अनेक वर्षाचे स्नेहसंबध आहेत. त्यामुळे या भेटींचा वेगळा अर्थ काढू नये. लोकशाहीत कुणीही कुठेही जाऊ शकतो. कुणी कुणाला भेटावे याचा सर्वांना अधिकार आहे.

यावेळी एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरही वक्तव्य केले. खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील. याबाबत  महाविकास आघाडीची चर्चा सुरु आहे. एकमेकांना भिडण्यासाठी इथे कुस्त्या खेळायच्या नाहीत. विकास प्रकल्पाला कुठेही स्थगिती दिलेली नाही, आढावा घेण्याचे काम सुरु आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. आम्हाला 170 आमदारांचे समर्थन आहे. भविष्यात हा आकडा आणखी वाढेल, असे देखील त्‍यांनी सांगितले. 

यासोबतच उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राला गोड बातमी मिळाली आहे, असा रेशीम चिमटा देखील एकनाथ शिंदे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी काढला.