Sat, Jul 04, 2020 07:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्थिक मंदीचा फटका १६ लाख रोजगारांना

अर्थिक मंदीचा फटका १६ लाख रोजगारांना

Last Updated: Jan 14 2020 11:32AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्या काही महिन्यापासून देशात अर्थिक मंदीची चणचण अधिक जाणवू लागली आहे. दरम्यान एसबीआयच्या एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील अर्थिक मंदीचे पडसाद आता रोजगार निर्मितीवरही उमटले आहेत. चालू वित्त वर्षात जवळपास १६ लाख रोजगारांच्या संधी कमी होणार असल्याची चिंताग्रस्त माहिती समोर आली आहे.

एसबीआय रिसर्च रिपोर्ट इकोरॅपच्या अहवालानुसार, यंदा सुरू असलेल्या आर्थिक वर्षात जवळपास १६ लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. मागील वर्षी एकूण ८९.७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. त्यात यंदाच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात घट होणार आहे. याचा सर्वाधिक फटका यूपी, बिहारसारख्या राज्याला बसणार आहे.

अर्थव्यवस्थेपायी नोकऱ्यांमध्ये १५.८ टक्क्यांची कपात नोंदवण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(ईपीएफओ) प्रतिमहिना १५ हजारांहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करत असते. एप्रिल-ऑक्टोबर २०१९ पर्यंत ४३.१ लाख रोजगारांची निर्मिती झाली, जी वित्त वर्षाच्या शेवटाला ७३.९ लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

अहवालानुसार आसाम, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा अशा राज्यांमधील नागरिक नोकरीच्या निमित्ताने परराज्यात, दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांच्याकडून घरी पाठवण्यात येणाऱ्या रक्कमेत घट झाली असल्याचे समोर आले आहे. तसेच,  पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यात रोजगाराच्या संधी होत्या. मात्र, याच राज्यात रोजगारांच्या संधी कमी झाल्या असल्याचे समोर आले आहे.