Tue, Aug 04, 2020 14:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहाची अज्ञातांकडून तोडफोड! (video)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहाची अज्ञातांकडून तोडफोड! (video)

Last Updated: Jul 08 2020 8:03AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर काल (ता.७) दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोडही केली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आली आहे. यात घरातील कुंड्यांही फोडण्यात आल्या आहेत. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

अधिक वाचा :  कोरोनामुळे आता केवळ १५% कर्मचार्‍यांच्या बदल्या

बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतके महत्त्वाचे हे स्थान मानले जाते. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अधिक वाचा :  जिओवरील शिक्षण : पालकांना भुर्दंड

दादर येथील 'राजगृह' या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.