Mon, Sep 21, 2020 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुळ्यात किरकोळ कारणावरून दगडफेक

धुळ्यात किरकोळ कारणावरून दगडफेक

Published On: Dec 21 2017 4:48PM | Last Updated: Dec 21 2017 4:48PM

बुकमार्क करा
स्पेशल आयजींच्या दै-रा असताना घडली घटना


नवी मुंबई: प्रतिनिधी

बुधवारी रात्रीच्या सुमारास धुळे शहरातील अतिसंवेदनशील असलेल्या गजानन कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन वादाचे परिणाम म्हणून दोन्ही गटांकडून तुरळक दगडफेक करण्यात आली. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिह परदेशी, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिवनसिंग वसावे, ४०गाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे, शहर पोलीस निरीक्षक गांगुर्डे, आजाद नगर पोलीस निरीक्षक पवार, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचल्याने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

आज गुरुवारी  २१ रोजी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विनय कुमार चौबे हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी घटनेची माहिती घेत जिल्हा पोलिस प्रमुख, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक व पोलिस अधिकार्‍यांसमवेत घटनास्थळाची पाहणी करत वारंवार घडणाऱ्या घटनांवर उपाययोजना करण्याबाबत माहिती देत धुळे शहरवासियांना शहरात शांतता असून अफवांवर विश्‍वास न ठेवता पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.