Sun, Jan 17, 2021 05:08
धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मांचे फोटो व्हायरल

Last Updated: Jan 13 2021 11:44AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रेणू शर्मा यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचा युवा नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. दरम्यान, या आरोपानंतर रेणू यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 


 


नेमकं काय आहे प्रकरण? 

रेणू यांच्या दाव्यानुसार,  रेणू शर्मा यांचे वय १६-१७ इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा या दोघांचा १९९८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेल्या. आपण (रेणू) घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होते. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केला आहे.