Sun, Jan 17, 2021 04:52
धनंजय मुंडेंना शोषणाचे आरोप पाहता मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही : चंद्रकांत पाटील

Last Updated: Jan 13 2021 5:16PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. या संदर्भात त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हे आपले ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टॅग केले आहे.

धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ शकते का? कायदेशीर प्रक्रिया काय सांगते

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्याबद्दल तत्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावरील शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे. 

धनंजय मुंडे यांना द्विभार्या प्रतिबंधक कायदा का लागू होत नाही? 

ते पुढे म्हणतात की, भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि आम्ही आता या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. पण तरीही मुंडे यांने या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे, अशीही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या प्रकरणी भाजपच्या वतीने आम्ही राज्यभर आंदोलन करणार असल्याचाही त्यांनी इशारा दिलाय. 

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अन्यथा...! भाजप महिला मोर्चाचा इशारा, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

'त्या' महिलेचे आणि माझे सहमतीने संबंध होते : मंत्री धनंजय मुंडे