'मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये समन्वयाचा अभाव'

Last Updated: Jul 04 2020 11:44AM
Responsive image
देवेंद्र फडणवीस


मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवी मुंबई, पनवेल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये समन्वयाचा अभाव आहे. कोरोनावर मात करायची असेल तर राज्य सरकारमध्ये समन्वय हवा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

वाचा : मित्रपक्षांनाही विचारात घ्या

पुढच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सरकारनं काम करायला हवं. मोठे निर्णय घेताना समन्वय असायला हवा. तसेच सरकारच्या वाहन खरेदीवरून त्यांनी सरकारचं प्राध्यान्य नेमकं कशाला, असा सवाल केला आहे. वाहन खरेदी ही सरकारची प्राथमिकता असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

शासकीय रुग्णांलयात रुग्णांसाठी बेड्स उरलेले नाहीत. त्यांना खासगी रुग्णालयात जावं लागतंय. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. टेस्टिंग संख्या दुपटीने वाढवायला हवी, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

वाचा : देशात एका दिवसात २२ हजारांहून अधिक रूग्ण

राज्यातील ठाकरे सरकार कोरोनाच्या हाताळणीमध्ये चुका करत आहे. राज्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने बदनामीच्या भीतीने सरकारने कोरोना चाचण्या कमी केल्या आहेत. मात्र, चाचण्या कमी करून कोरोनाची लढाई कदापीही जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोरोनाशी नाही, तर आकडेवारीशी लढते आहे, अशी टीका याआधी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.