Wed, Jun 03, 2020 21:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बंगल्यांवर उधळपट्टी; अजित पवारांनी उपटले मंत्र्यांचे कान

अजित पवारांनी उपटले मंत्र्यांचे कान

Last Updated: Feb 20 2020 3:55PM
 

 

 

 

मुंबई: पुढारी ऑनलाईन

बंगले दुरुस्ती करण्याच्या नावाखाली बंगल्यांमध्ये महागड्या वस्तू खरेदी करणाऱ्या मंत्र्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच कान उपटले. महाराष्ट्र विकास आघाडीतील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधीची उधळपट्टी होत आहे. ३१ बंगल्यांसाठी तब्बल १५ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत सर्व मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवण्याचा आदेश अजित पवारांनी सार्वजनिक विभागाला दिला आहे. 

सोन्याने घाम फोडला;इतिहासातील सर्वाधिक दरवाढ

यासोबतच वास्तुविशारदांनी सुचवलेल्या महागड्या वस्तूंचा खर्च टाळावा, अशी सूचनाही अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपनेही बंगल्यांवरील उधळपट्टीवर कडक शब्दांत टीका केली होती. मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगल्याची कंत्राटं देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अजित पवारांनी या विभागालाच खर्च आवरण्याचे निर्देश दिले आहेत.

या बंगल्याची केवळ संरचनात्मक दुरुस्ती करण्यात यावी. त्यात महागड्या वस्तू घेऊ नये. जो खर्च मंजूर करण्यात आला आहे, त्याव्यक्तिरिक्त बंगल्यावर अनाठायी खर्च करू नका. खर्च मर्यादेतच ठेवा, असे निर्देश पवार यांनी जारी केलेल्या पत्रकात दिले आहे. 

शिवेंद्रराजेंची प्रकृती ठणठणीत; उदयनराजेंचे ट्विट

२०१३ साली अजित पवारांनी दिली होती भरपाई

उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर असाच लाखोंचा खर्च करण्यात आला होता. माहिती अधिकारात ही बाब उघड होताच अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला २७ लाखांचा चेक दिला होता. आता अजित पवारांचा हाच आदर्श महाराष्ट्र विकास आघाडीतले मंत्री घेणार का? आणि सामान्य जनतेचा पैशांचा चुराडा वाचवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोणत्या बंगल्यावर किती खर्च

 शिवनेरी: १ कोटी १७ लाख

 अग्रधुत: १ कोटी २२ लाख

 ज्ञानेश्वरी: १ कोटी १ लाख

 पर्णकुटी: १ कोटी २२ लाख

 सेवासदन: १ कोटी ५ लाख

 रॉयल स्टोन: १ कोटी ८१ लाख

 रामटेक: १ कोटी ४८ लाख

 मेघदूत: १ कोटी ३० लाख

 सातपुडा: १ कोटी ३३ लाख