देवी विसर्जन करताना बुडालेल्या 4 पैकी दोघांचे मृतदेह सापडले 

Last Updated: Oct 10 2019 8:13PM
Responsive image
देवी विसर्जन करताना वाहून गेलेले तरुण

Responsive image

टिटवाळा : प्रतिनिधी

मांडा पश्चिम भागातील जानकी विद्यालय परिसरात असलेल्या ओमकारेश्वर सदन चाळ येथील चार तरुण दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना नदीत बुडाले. ही घटना वासुंद्री गावा लगतच्या काळू नदी पात्रात बुधवारी रात्री १२  ते १२:३०च्या  दरम्यान घडली. पोलिस प्रशासन, अग्निशामक दल व स्थानिक गावतील पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने  काल रात्रीपासून त्यांचा शोध सुरु होता. आज सायंकाळी ४.१५ च्या दरम्यान तब्बल १८ तासानंतर  यातील दोन तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे. 

टिटवाळा पश्चिमेकडील जानकी विद्यालय शाळेच्या बाजूला असलेल्या येथील ओमकारेश्वर सदन चाळ या ठिकाणी सार्वजनिक उत्सव मंडळाची देवीची  मूर्ती  बुधवारी रात्री विसर्जन करण्यासाठी येथील वासुंद्री गावाजवळील काळू नदीवर आणण्यात आली होती. यावेळी ही  देवीची मूर्ती त्यांच्या अंगावर आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते चौघे पाण्याच्या प्रवाहात वाहत गेले. रुपेश पवार (२२), विश्वास पवार (२४) हे दोघे सख्ये भाऊ तसेच सिदेश पार्टे (२४), सुमीत वायदंडे (२५ )अशी या चार युवकांची नावे आहेत .   
याबाबत तत्काळ टिटवाळा पोलिस यांना कळविण्यात आले. मध्यरात्री उशिरापर्यंत  स्थानिक लोक व पोलिस  यांचे शोधकार्य सुरू होते. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागला नाही. अग्निशमनदलाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि स्थानिक तरुण यांनी आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले असताना सायंकाळी ४.१५ च्या दरम्यान तब्बल १८ तासानंतर  यातील दोन तरुण रुपेश तुकाराम पवार (२२), सुमित मारूती वायदंडे (२५) यांचे मृतदेह हाती लागले. तर आणखी दोघांचा शोध सुरूच आहे. 
या घटनेमुळे मांडा-टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

बुधवारी रात्री आंधार व पाण्याचा प्रवाह यामुळे तसेच गुरूवारी दुपारी भरतीची वेळ असल्यामुळे पाणी वाढत आहे. या कारणास्तव शोध कार्यात अडचणी येत आहे. अग्निशामक दल व स्थानिक पोसणाऱ्यांच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे. लवकरच  इतर दोन तरूणांचा शोध लागेल .

-कमलाकर मुंडे, पीएसआय, टिटवाळा