Thu, Jun 24, 2021 11:36
ज्येष्ठ सतारवादक पंडित देबू चौधरी यांच्या निधनानंतर मुलगा प्रतीकचेही कोरोनाने निधन

Last Updated: May 07 2021 5:43PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ज्येष्ठ सतारवादक पंडित देबू चौधरी यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाल्यानंतर आता त्याचा मुलगा प्रतीक चौधरीचे निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर एका आठवड्यातच प्रतीकचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पंडित देबू चौधरी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना काही दिवसांपुर्वी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यानंतर त्यांची तब्येत खालावल्याने यात त्यांचा मृत्यू झाला. या दरम्यान पंडित देबू यांचा मुलगा प्रतीकची तब्येत बिघडली. प्रतीकला दिल्लीतील गुरु तेग बहादुर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. यानंतर प्रतिकने आज अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर लगेच मुलाचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतिक यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.

वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार वनराज भाटिया यांचे निधन

सीतू महाजन कोहली यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी प्रतीक यांच्या निधनाच्या काही दिवस अगोदर काय घडले याविषयी लिहिले आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, ‘प्रतीक यांना त्यांचे वडील देबू चौधरी यांच्या शेजारी रुग्णालयात बेड हवा होता. वडिलांच्या निधनानंतर एका आठवड्यामध्येच प्रतीक यांचे निधन झाले. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही' अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

वाचा :Happy B'day : अश्विनी भावेची लिंबू कलरची साडी अन्‌...