Wed, May 12, 2021 01:28
CSK च्या ऋतुराजची सायली संजीवच्या फोटोंवर 'ही' खास कमेंट

Last Updated: May 04 2021 3:59PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन  

टीव्ही मालिका ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने आपले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एक खास फोटोत तिने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सायली अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने तिला खास कमेंट दिल्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

May be an image of 1 person, sitting, footwear and indoor

मध्यंतरी सायली बोल्ड सीनमुळे चर्चेत आली होती. झिम्मा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिचे काही बोल्ड सीन आहेत. त्यावेळी सायलीच्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

May be an image of 1 person, sitting, footwear and indoor

एकीकडे तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पण, ऋतुराज गायकवाडची कमेंट हटके आणि खास ठरली आहे. ऋतुराजने "Woahh" अशी कमेंट केल्याने सायलीच्या या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

May be an image of 1 person, standing and jewellery

अनेक मराठी मालिकांबरोबरचं तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्याचबरोबर तिचा हा प्रवास छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. सायलीने 'आटपाडी नाईट्स', 'सातारचा सलमान', 'बस्ता', 'पोलीस लाइन' या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

May be an image of 1 person and standing

May be an image of 1 person and standing

May be an image of 1 person, standing, tree and outdoors

May be an image of 1 person, standing and outdoors

May be an image of 1 person and standing