Thu, Aug 06, 2020 04:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड उल्लेख; कृषीमंत्र्यांकडून कारवाईचे निर्देश

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड उल्लेख; कृषीमंत्र्यांकडून कारवाईचे निर्देश

Last Updated: Jul 14 2020 2:29PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड - १९ असा उल्लेख करण्यात आला आहे. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्य  शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत. 

अधिक वाचा :  देश कोरोना संकटाशी झुंजत असताना सरकार पाडण्याचे भाजपकडून उपद्व्याप- शिवसेना

यासंदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना कृषीमंत्र्यांनी पत्र पाठविले आहे. कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविडचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा, असे भूसे यांनी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.