Tue, May 26, 2020 14:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका

शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला दणका

Last Updated: Feb 28 2020 2:57PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला उध्दव ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द केले आहे. महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर ही कारवाई केली.

अधिक वाचा :  ओबीसी स्वतंत्र जनगणनेवर विधानसभेत एकमताची 'वज्रमूठ'!

छिंदमविरोधात कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीवर गुरुवारी (ता.27) सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. मात्र छिंदमने गैरहजेरी लावली. त्याला आज सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते तो आजही अनुपस्थित राहिल्याने  मुदतवाढ न देता किंवा त्याची वाट न पाहता नगरविकास विभागाने कारवाई करत निकाल दिला.

श्रीपाद छिंदम प्रकरण काय आहे?

फेब्रुवारी २०१८ मध्‍ये फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये छिंदम नगरच्या उपमहापौरपदी असताना ठेकेदाराशी उर्मट भाषेत बोलत होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही त्याने अपशब्द काढले. ज्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठवण्‍यात आली. या प्रकरणामध्ये त्याला त्याचे पद गमवावे लागले होते. यासोबतच भाजपनेही छिंदमला पक्षातून बाहेरचा रस्‍ता दाखवला होता. 

अधिक वाचा : मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण; सरकार अध्यादेश काढणार!