Fri, Oct 30, 2020 07:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना : आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी, शरद पवारांची घोषणा 

कोरोना : आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी, शरद पवारांची घोषणा 

Last Updated: Mar 26 2020 9:23PM

शरद पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरोनाचा धोका वाढला असल्याने राज्य सरकार तसेच केंद्र सरकार या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्ष सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांच्या आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

वाचा : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औषधांची दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी 

'कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून,  शेती व उद्योगधंद्यावर देखील मोठे संकट ओढवले आहे. ह्या अभूतपूर्व संकटावेळी राष्ट्रवादी पक्ष जनतेसोबत ठाम उभा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

वाचा : मुंबई : राज्यात करोना बाधित ३ नवीन रुग्ण

''राष्ट्रवादी पक्षाची एक सामाजिक जबाबदारी म्हणून राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा ह्या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे,'' असे शरद पवार यांनी अधिकृत पत्रकात नमूद केले आहे. 

Image

 "