Mon, Aug 10, 2020 04:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातही लॉकडाऊनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ 

ठाण्यातही लॉकडाऊनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ 

Last Updated: Jul 10 2020 5:23PM

संग्रहित छायाचित्रठाणे : पुढारी ऑनलाईन

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे ठाणे शहरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगर पालिकेने आदेश काढला आहे. या आदेशात ठाण्यात लॉकडाऊन वाढवल्याचे जाहीर केला आहे. यात लॉकडाऊनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आल्याचे म्हटले आहे. 

मागील आठवड्यात लॉकडाऊन १२ जुलै पर्यंत संपणार असल्याचे जाहीर केले होते. आता तो लॉकडाऊन संपन्याअगोदर आता १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी २ जुलै ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता.

आणखी काही कालावधीसाठी लॉकडाऊन वाढवणे गरजेचे आहे. त्यामळे १२ जुलैपासून सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करत आहोत असे आदेशात म्हटले आहे. 

पुण्यातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १३ जुलै ते २२ जुलै या कालावधीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आणि काही ग्रामीण भागात कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. केवळ दूध आणि मेडिकल स्टोअर व रुग्णालये यासारख्या अत्यावश्यक सेवांशी संबंधित दुकाने खुली असतील, अशी माहिती  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर दिली आहे. 

वाचा :बिग ब्रेकिंग : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कडकडीत लॉकडाऊन जाहीर; काय सुरु आणि काय बंद?