Sun, Sep 27, 2020 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण पूर्वेतील पालिका रुग्णालयातील ओपीडी बंद

कल्याण पूर्वेतील पालिका रुग्णालयातील ओपीडी बंद

Last Updated: Apr 03 2020 9:52AM
कल्याण : पुढारी वृत्तसेवा   

शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना खासगी दवाखाने बंद ठेवण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन प्रसासनातर्फे करण्यात आले होते. अन्यथा कारवाईचे आदेश दिले गेले होते. तर आता पालिकेचे कल्याण पूर्वेतील गीता हरकिसनदास रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग काल बंद ठेवण्यात आल्याचे फलक लावत ओपीडी बंद करण्यात आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला गेला.

याबाबत, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र, काल (दि.२ एप्रिल) शासकीय सुट्टी असल्यामुळे या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला. या काळात रुग्णालय सुरू ठेवण्याबाबत त्यांना माहीत नव्हते. म्हणून रुग्णालय बंद ठेवले आम्हाला याबाबत काहीच कळवले नाही, असे उत्तर दिले .

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कल्याण पूर्वेत आतापर्यंत ५ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्दी-ताप खोकल्याची लक्षणे दिसल्यास घाबरलेले नागरिक रुग्णालयात धाव घेत असल्यामुळे रुग्णालये गजबजलेली असतात. कल्याण पूर्वे येथे पालिकेच्या गीता हरकिसनदास रुग्णालयात कल्याण पूर्वेतील रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात. साथरोग काळात राष्ट्रीय सणाच्या सुट्टीच्या काळात रुग्णालये सुरू ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, तरीही हे आदेश धाब्यावर बसवत कल्याण पूर्वेतील गीता हरकीसन दास रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहणार असल्याचे फलक रुग्णालय बाहेर लावण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, याबाबत पालिकेचे आरोग्य अधिकारी राजू लवंगारे यांना विचारले असता त्यांनी आज रामनवमी निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला आहे. साथरोग काळात सर्व रुग्णालय सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, त्या रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याला काहीही न कळवता किंवा परवानगी न घेताच हा विभाग बंद ठेवला असून आपल्याला हा विभाग बंद असल्याची माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. 

 "