नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 101 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत मृतांचा आकडा 137 ने वाढून 3720 वर गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली. रुग्ण संख्येत 6654 ने वाढ झाल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोना संक्रमणातून बरे झालेल्यांची संख्या 3250 ने वाढून 51 हजार 784 वर गेली आहे. चोवीस तासांत मृत पावलेल्यांपैकी 137 जणांपैकी सर्वाधिक 63 महाराष्ट्रातले आहेत. 29 जण गुजरातचे, प्रत्येकी 14 दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे, 6 पश्चिम बंगालचे, 4 तामिळनाडूचे, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशचे प्रत्येकी दोन तर हरियाणाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.
कोरोनाने आतापर्यंत 3720 लोकांचा बळी घेतला आहे, यातही महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यातील 1517 लोकांचा बळी गेला आहे. गुजरातमध्ये 802, मध्य प्रदेशात 272, प. बंगालमध्ये 265, दिल्लीत 208, राजस्थानमध्ये 153, उत्तर प्रदेशात 152, तामिळनाडूत 98 तर आंध्र प्रदेशात 55 लोकांचा बळी गेला आहे. याशिवाय तेलंगणमध्ये 45, कर्नाटकमध्ये 41, पंजाबमध्ये 39, जम्मू काश्मीरमध्ये 20, हरियाणात 16, बिहारमध्ये 11, ओडिशामध्ये 7, केरळ आणि आसाममध्ये प्रत्येकी 4, झारखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेशात प्रत्येकी 3 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्ण संख्येचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक 44 हजार 582 रुग्णांची संख्या असून तामिळनाडूत 14 हजार 753, गुजरातमध्ये 13 हजार 268, दिल्लीत 12 हजार 319, राजस्थानमध्ये 6494, मध्य प्रदेशात 6170, उत्तर प्रदेशात 5735, प. बंगालमध्ये 3332, आंध्र प्रदेशात 2709, बिहारमध्ये 2177, पंजाबमध्ये 2029, तेलंगणमध्ये 1761, कर्नाटकात 1743, जम्मू काश्मीरमध्ये 1489, ओडीशामध्ये 1189, हरियाणामध्ये 1067 तर केरळमध्ये 732 रुग्ण संख्या पोहोचली आहे.