Mon, Jan 25, 2021 06:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मुंबईतील जवळपास ९९ टक्के आयसीयू बेड फुल्ल'

'मुंबईतील जवळपास ९९ टक्के आयसीयू बेड फुल्ल'

Last Updated: May 29 2020 2:15PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

देशाबरोबरच मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील जवळपास सर्वच अतिदक्षता विभागातील बेड फूल झाले आहेत. ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे. 

मुंबईतील ११ हॉटस्पॉटमध्ये १५०० पेक्षा जास्त रुग्ण

बीएमसीच्या आकडेवारीनुसार 27 मे पर्यंत मुंबईतील 645 म्हणजेच जवळपास 99 टक्के आयसीयु बेड फूल झाले आहेत. तसेच 4 हजार 292 बेडपैकी जवळपास 65 टक्के बेडचे ऑक्सिजन सपोर्ट सिस्टम वापरात येत आहेत. याचबरोबर 373 व्हेंटिलेटरपैकी 72 टक्के व्हेंटिलेटर पेशंटसाठी वापरात येत आहेत. 

एक जूननंतर लॉकडाऊनचं काय होणार? अमित शहा आणि पीएम मोदींकडून बैठकांचा जोर

गुरुवारी मुंबईत जवळपास 1 हजार 438 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 35 हजार 273 वर पोहोचला आहे. तर गुरुवारी मुंबईत 38 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दुसरीकडे सारे प्रशासकीय कौशल्य पणाला लावून जे भयंकर वास्तव आतापर्यंत दडवून ठेवले गेले ते अखेर समोर आले आहे. मुंबईतुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या मुंबई महापालिकेच्या तब्बल 1529 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 38 जणांचा मृत्यू झाला असून 967 पेक्षा जास्त कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे 60 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात. त्यामुळे मुंबईसह देशात लॉकडाऊन लागू असतानाही पालिका कर्मचारी कार्यरत होते. यात डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्डबॉय, अधिकारी, आपत्कालीन कक्ष, सफाई कामगार, अग्निशमन दल व सुरक्षा विभाग कर्मचारी आदींचा समावेश आहे.

राज्य सरकार मध्ये 5 टक्के कर्मचारी उपस्थित असतानाही मुंबई महानगरपालिकेमध्ये 75 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह आता अन्य विभागातील कर्मचार्‍यांनाही कामावर उपस्थित रहावे लागत आहे. महापालिकेत कार्यरत असलेले 40 टक्के कर्मचारी हे मुंबईबाहेरून वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ आदी भागातून मुंबई येतात. या कर्मचार्‍यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पण या कर्मचार्‍यांकडे कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क व्यतिरिक्त अन्य कोणतीही सुविधा नाही.