Fri, May 07, 2021 18:04
लॉकडाऊन काळात ७५ लाख नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, सेंट्रर फॉर मॉनि​टरिंग इंडियन इॅकोनॉमीची माहिती

Last Updated: May 05 2021 2:25AM

संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महामारीची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी देशातील अनेक राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याची नामुष्की ओढावली आहे. पंरतु, लॉकडाऊनचा फटका बसल्याने देशातील सुमारे ७५ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा करण्यात आलेला लॉकडाऊन हा देशव्यापी नसून स्थानिक पातळीवर लागू करण्यात आला आहे. असे असले तरी गेल्या चार महिन्यांमध्ये जवळपास ८% नोकरदारांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे, अशी माहिती भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सेंट्रर फॉर मॉनि​टरिंग इंडियन इॅकोनॉमी या (सीएमआयई) संस्थेने दिली आहे.

रोजगार क्षेत्रात पुढचे काही दिवस पुन्हा तेजी दिसणे काहीसे आव्हानात्मक राहील. एकट्या ए​प्रिल महिन्यात मार्च महिन्याच्या तुलनेत ७५ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. एकाच महिन्यात बेरोजगारीचा दर त्यामुळे वाढला आहे, असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा :  कोरोना- २४ तासांत रुग्णसंख्येत किचिंत घट

केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा राष्ट्रीय दर ७.९७% इतका आहे. यापैकी शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण काहीसे कमी आहे. शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण अनुक्रमे ९.७८% आणि ७.१३% इतके आहे. राष्ट्रीय बेरोजगारीचा एकूण दर ६.५०% इतका आहे. बेरोजगारीचा हा दर मार्च आणि नोव्हेंबर महिन्यातील असून शहर आणि ग्रामीण भागातील आहे.

अधिक वाचा : LIVE : ‘गोकुळ’मध्ये विरोधी गटातील अंजना रेडेकर, सत्ताधारी गटातील शौमिका महाडिक विजयी 

दुसऱ्या लाटेमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणचे उद्योग व्यवसाय ठप्प असून केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात आर्थिक उसंत मिळाली असली तरी मोठा आर्थिक फटका बसला आहे. येत्या काळात बेरोजगारी वाढीचा दर कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. कोरोना स्थिती आटोक्यात येताच बेरोजगारीचा दर कमी होण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास स्थंस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे.