Wed, Jun 03, 2020 00:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात आणखी एक बळी; कोरोनाग्रस्त महिलेचा वाशीत मृत्यू

राज्यात आणखी एक बळी; कोरोनाग्रस्त महिलेचा वाशीत मृत्यू

Last Updated: Mar 26 2020 12:25PM
नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील कोरोनाचे संकट अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना मृतांचा आकडाही हळुहळू वाढू लागला आहे. वाशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. काल सांगली, मुंबई, पनवेल भागात कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या रुगणांचा आकडा १२४ वर पोहोचला आहे.