Sat, Jul 04, 2020 07:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात कोरोनाग्रस्तांनी हजारचा आकडा गाठला! 

देशात कोरोनाग्रस्तांनी हजारचा आकडा गाठला! 

Last Updated: Mar 30 2020 9:01AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांना न जुमानता, जागतिक साथीचा कोरोना हळूहळू भारताच्या विविध भागात पोहोचत आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार, रविवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १ हजार १२० वर पोहोचली आहे. यामधील ९६ लोक असे आहेत जे एकतर परदेशी आहेत किंवा कोरोनातून बरे झाले आहेत. या व्यतिरिक्त या साथीच्या आजारामुळे ३० जणांचे प्राणही गेले आहेत. या आकडेवारीत महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांची स्थिती सर्वांत चिंताजनक आहे. या दोन राज्यात ४०० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे.

अधिक वाचा : रस्त्यावर दिसल्यास ‘सरकारी’ क्वारंटाईन

महाराष्ट्रात आतापर्यंत २०९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २५ लोक या विषाणूचा पराभव करून पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी एकट्या मुंबई व ठाण्याला मिळून ११० संक्रमित लोक आहेत. पुण्यात ३७, नागपूरचे १६, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद ३, यवतमाळ ३, सांगली २५, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ३, जळगाव आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक जण आढळून आला आहे. 

अधिक वाचा : झोपडपट्ट्यांमध्ये शिरला कोरोना

भारतातील कोरोनाची पहिली घटना केरळमध्ये आढळून आली. आता येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जरी हे राज्य महाराष्ट्रापेक्षा खूपच लहान असले, तरी देखील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण २०० पेक्षा जास्त आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत केरळमधील २०२ लोकांमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाली आहे. यापैकी १६ लोक बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. युएईमधील बहुसंख्य भारतीय केरळमधील स्थलांतरित आहेत. या मल्याळम भाषिक लोकांची युएईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. परदेशात प्रवास करणारे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत.

अधिक वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्री कृतीत आणा