Tue, Aug 04, 2020 13:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'कोरोना हे १०० वर्षांतील आरोग्य, अर्थव्यवस्थेवरील सर्वांत मोठे संकट' 

'कोरोना हे १०० वर्षांतील आरोग्य, अर्थव्यवस्थेवरील सर्वांत मोठे संकट' 

Last Updated: Jul 11 2020 12:10PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दासनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना हे गेल्या १०० वर्षांतील आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील सर्वांत मोठे संकट आहे. यामुळे उत्पादन आणि नोकरी या क्षेत्रात नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, अशी चिंता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ७ व्या बँकिंग आणि इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये संबोधित केले.

वाचा : 'तुम्ही सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', यावर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

सध्याच्या संकट काळातदेखील भारतीय कंपन्या आणि उद्योग चांगला प्रकारे प्रतिसाद देत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनामुळे थकीत कर्जांमध्ये (एनपीए) वाढ होईल. तसेच बँकांच्या भांडवली पर्याप्तता निधीमध्ये घसरण होईल, असा अंदाज दास यांनी वर्तविला आहे.

वाचा : 'शिवसेना मायनस केली असती तर भाजपला ४०-५० जागा मिळाल्या असत्या'

अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी आरबीआयने फेब्रुवारी २०१९ पासून रेपो रेट दरात २५० बेसिस पॉईंट्सने कपात केली आहे. तर यंदा फेब्रुवारीपर्यंत रेपो रेट १३५ बेसिस पॉईंट्सने कमी केला आहे, अशी माहितीही आरबीआय गर्व्हनर दास यांनी दिली.

वाचा : मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना जनतेनेच धडा शिकवला