Tue, May 26, 2020 16:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : कोरोनाबाधित मृतदेह हाताळणारे कर्मचारी क्वॉरंटाईनमध्ये

मुंबई : कोरोनाबाधित मृतदेह हाताळणारे कर्मचारी क्वॉरंटाईनमध्ये

Last Updated: Apr 01 2020 8:54PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कुर्ला येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह राजेवाडी येथील रुग्णालयात आणला होता. तो मृतदेह हाताळणाऱ्या  रुग्णालयातील तीनपैकी २ वैद्यकीय कर्मचाऱ्याना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून एकावर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अधिक वाचा : कोराना बाधित आढळलेला वसईतील 'तो' परिसर बंद! 

एका व्यक्तीला २८ मार्च रोजी कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सबंधित रुग्णास कोरोना झाल्याचे निदान झाले. त्या रुग्णाचे २९ मार्च रोजी निधन झाले असता त्याच दिवशी संध्याकाळी ८ वाजता विनोबा भावे नगर ठाण्याच्या पोलिसांनी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील शवागृहात शवविच्छेदनासाठी तो मृतदेह आणला होता. दुर्दैवाने या मृतदेहाच्या संपर्कात शवागृहातील ३ शासकीय कर्मचारी आले होते. यापैकी २ कर्मचाऱ्यांची राजावाडी आणि एकाची कस्तूरबा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. दोघांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर एकजण कस्तूरबा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती एका कामगार नेत्याने दिली.

अधिक वाचा : राज्यात ३३ नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ३३५