मुंबई : पुढारी ऑनलाईन
राज्यात नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजणार राजकीय धुळवड रंगवणार याची स्पष्ट चिन्हे आहेत. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनंगर असा सीएमओ ट्विटर हँडलवर उल्लेख राजकीय वादळ उठले होते. आता हा वाद ताजा असतानाच पुन्हा उस्मानाबादचा उल्लेख आज धाराशिव असा करण्यात आला आहे.
सीएमओकडून उभय शहरांचा उल्लेख संभाजीनगर आणि धाराशिव झाला असला तरी त्यासाठी कोणतीही शासकीय अधिसूचना निघालेली नाही किंवा तशी चर्चाही झालेली नाही. दोन्ही शहरांचे नावे बदलण्यावर शिवसेना ठाम आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करण्यात येतो. तसाच उल्लेख उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो.
औरंगाबादचा नामांतराला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. त्याच्या विरोधाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगजेब काही सेक्युलर नव्हता, असे प्रत्युत्तर दिले. औरंगाबाद नामांतरावरून महाविकास आघाडीमधील बेबनाव समोर आला होता.
संभाजीनगर असा उल्लेख करण्यात नवीन ते काय? आम्ही वर्षानुवर्षे तेच लिहीत-बोलत आलो आहे आणि तेच करत राहणार. औरंगजेब काही ‘सेक्युलर’ नव्हता. त्यामुळे आमच्या समान किमान कार्यक्रमाच्या अजेंड्यात जो काही ‘सेक्युलर’ हा शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही, असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिले.
महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस या दोन सत्ताधारी पक्षात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या (सीएमओ) कार्यालयाने सलग दोन दिवस औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख केला. यावरून काँग्रेसने तीव्र शब्दांत आक्षेप घेत महाविकास आघाडी बनविताना शहरांच्या नामांतरांचा विषय हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. शहरांची नावे बदलून विकास होत नाही, अशी टीका केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.