Fri, Jul 03, 2020 04:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७ जूनपासून वृत्तपत्र घरपोच मिळणार : मुख्यमंत्री ठाकरे (video)

७ जूनपासून वृत्तपत्र घरपोच मिळणार : मुख्यमंत्री ठाकरे (video)

Last Updated: May 31 2020 8:56PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लॉकडाऊन हा शब्द अंगवळणी पडला आहे. या काळात जन्माला आलेल्या नवजात मुलांच्या कानावर आईपेक्षा जास्त लॉकडाऊन हाच शब्द पडत आहे. पण, आज मी आपल्यासमोर आलोय ते लॉकडाऊन हा शब्द कच-याच्या टोपलीत फेकायला. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पुढच्या रविवार (७ जून) पासून वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करता येणार आहे. यावेळी वृत्तपत्र वितरक मुलांची काळजी घेणे अनिवार्य आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ३ तारखेपसून आऊटडोअर व्यायाम तर ५ तारखेपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बाहेर फिरताना मास्कचा वापर अत्यंत गरजेचा आहे. घराबाहेर पडणा-यांनी घरात येताना काळजी घ्यावी. आपल्या घरातल्यांना संसर्ग होऊ नये याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. जेष्ठ नागरिक आणि विकार असलेल्यांनी घरातच रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, येत्या काही तासात पश्चिम किनारपट्टीवर वादळ येणार आहे. त्यामुळे पश्चिप किनारपट्टीवरील नागरिकांनी दक्षता घ्यावी. मच्छिमारांनी सुरक्षीतता बाळगावी. पुढील चार दिवस समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  

आज लॉकडाउन ४.० चा शेवटचा दिवस असून उद्यापासून लॉकडाऊन ५.० सुरू होत आहे. लॉकडाउन ४.० संपण्याआधी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. राज्य सरकार ‘मिशन बिगीन अगेन’ या धोरणातंर्गत अनलॉकची नवी योजना घेऊन येत आहे. या योजने अंतर्गत काही प्रमाणात निर्बंधांमधून सवलती दिल्या आहेत. ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असला तरी तीन टप्प्यांत वेगवेगळया गोष्टी सुरू होणार आहेत.