Wed, Apr 01, 2020 23:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून कोल्हापुरातून 'यांना' संधी मिळाल्याची चर्चा!

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून कोल्हापुरातून 'यांना' संधी मिळाल्याची चर्चा!

Last Updated: Dec 30 2019 8:01AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपुढारी ऑनलाईन डेस्क
 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास महाआघाडी सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज (ता.३०) होत आहे. विधानसभेच्या प्रांगणात दुपारी एक वाजता मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. 

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबिंग केले आहे. अखेरच्या क्षणापर्यंत कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, विधान परिषदेवर निवडलेल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देऊ नये, अशा तीव्र भावना शिवसेनेसह तिन्ही पक्षांत व्यक्‍त होत आहेत.

दरम्यान एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन अपक्ष आमदारांना संधी मिळाल्याची चर्चा आहे. यामध्ये शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना लॉटरी लागल्याची चर्चा आहे. 

जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव संभाव्य यादीत होते, पण त्यांच्याऐवजी यड्रावकरांना संधी मिळाल्याची चर्चा आहे.  त्याचबरोबर नेवासाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख, अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तारांना लॉटरी लागली असून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती आहे. गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळणार आहे. शिवसेनेकडून आठ नव्या चेहऱ्यांना संधी  मिळाली आहे. 

शपथ घेणार्‍यांची संभाव्य नावे अशी 

शिवसेना : उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, दादा भुसे, संजय राठोड, अब्दुल सत्तार, राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळचे अपक्ष आमदार), शंकरराव गडाख (नेवासाचे अपक्ष आमदार), बच्चू कडू (अचलपूरचे अपक्ष आमदार), संदीपान भुमरे

राष्ट्रवादी : पश्‍चिम महाराष्ट्र - अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, विदर्भ - अनिल देशमुख, ठाणे - जितेंद्र आव्हाड, मुंबई - नवाब मलिक, मराठवाडा - धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, बाबा जानी दुराणी, कोकण - अदिती तटकरे, उत्तर महाराष्ट्र - डॉ. किरण लहामटे.

काँग्रेस : उत्तर महाराष्ट्र - के. सी. पाडवी, मराठवाडा - अशोक चव्हाण, अमित देशमुख, पश्‍चिम महाराष्ट्र - सतेज पाटील किंवा पी. एन. पाटील, प्रणिती शिंदे, विश्‍वजित कदम, संग्राम थोपटे, विदर्भ - विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, मुंबई - वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल.