Fri, Apr 23, 2021 14:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर काँग्रेसची यादी आली!; सतेज पाटील, विश्वजित कदमांना संधी; पृथ्वीराज चव्हाणांचा पत्ता कट

अखेर काँग्रेसची यादी आली!; सतेज पाटील, विश्वजित कदमांना संधी; पृथ्वीराज चव्हाणांचा पत्ता कट

Last Updated: Dec 30 2019 9:10AM
पुढारी ऑनलाईन डेस्क 
 

आज होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 10 मंत्रिपदापैकी आठ जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूरचे सतेज पाटील आणि सांगलीचे विश्वजित कदम राज्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसने खाती देताना प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी पश्चिम महाराष्ट्राला काँग्रेसने कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं नाही. 

अधिक वाचा : कोल्हापूरातून तिघांना मंत्रिपदाची 'लॉटरी!'; मंत्रिपदावरून हसन मुश्रीफ काय म्हणाले?

काल (ता. ३०) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. 

अधिक वाचा : मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून कोल्हापुरातून 'यांना' संधी मिळाल्याची चर्चा!

सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर थोरात यांनी पुन्हा मल्लिकार्जुन खडगे यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदीर्घ चर्चा केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. अनपेक्षितपणे सुनील केदार यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. 

काँग्रेसकडून अशोक चव्हाण (कॅबिनेट), के.सी.पडवी (कॅबिनेट), विजय वडेट्टीवार (कॅबिनेट), अमित देशमुख (कॅबिनेट), सुनिल केदार (कॅबिनेट), यशोमती ठाकूर (कॅबिनेट), वर्षा गायकवाड (कॅबिनेट), अस्लम शेख (कॅबिनेट), सतेज पाटील (राज्यमंत्री), विश्वजित कदम (राज्यमंत्री) यांना संधी देण्यात आली आहे.