Tue, Aug 11, 2020 20:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये बॅगेत महिलेचा शिर नसलेला मृतदेह

कल्याणमध्ये बॅगेत महिलेचा शिर नसलेला मृतदेह

Last Updated: Dec 09 2019 1:30AM
डोंबिवली : प्रतिनिधी

प्रतिनिधीकल्याण स्टेशन परिसरात टाकलेल्या बॅगमध्ये एका महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. शिर नसलेला हा मृतदेह बॅगेत भरून आणणारा संशयित   सीसीटीव्ही   कॅमेर्‍यात   कैद   झाला   आहे. अत्यंत क्रूरपणे हत्या करून या महिलेचा मृतदेह  टाकून  पळालेल्या  संशयिताला  हुडकून  काढण्यासाठी    पोलिसांच्या    चार    पथकांनी    वेगवेगळ्या दिशांना जाऊन तपासाला वेग दिला आहे.कल्याण पश्चिमेतील स्टेशनसमोर असलेल्या टॅक्सी-रिक्षा  स्टॅण्डला  रविवारी  पहाटे  5  वाजून  45  मिनिटांच्या  सुमारास  एक  काळ्या  रंगाची  मोठी  बॅग  काही  प्रवाशांनी  पाहिली.  सदर  इसम  रिक्षामध्ये  बॅग  घेऊन  जात  होता.  त्याचवेळी  रिक्षाचालकाला  त्या  बॅगमधून  दुर्गंधी  आल्याने  त्याने  सदर  बॅगधारक  इसमाला  हटकले  असता  त्याने घाबरून बॅग घटनस्थळी फेकून स्टेशनच्या दिशेने  पळ  काढला.  रिक्षावाल्यांनी  एसटी  स्टँड  पोलीस  चौकीतील  बीट  मार्शल्सना  एक  इसम  काळ्या  रंगाची  बॅग  बेवारस  स्थितीत  फेकून  पळाल्याची  माहिती  दिली.  

पोलिसांनी  दाखल  होऊन त्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये  एका  महिलेचा  अर्धा  मृतदेह  आढळून  आला. ही महिला अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील असावी. महिलेचा रंग गोरा असून पायामध्ये तिने पिवळ्या रंगाचा लेजिन्स परिधान केला आहे. याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस आणि  कल्याण  महात्मा  फुले  चौक  पोलिसांना  देण्यात आली. पोलिसांनी ही बॅग उघडून पाहताच त्यात एका महिलेचा अर्धवट मृतदेह होता. त्यात शिर  नसलेले  धड  आढळून  आले.  पोलिसांनी  घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सदर मृतदेह केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये    उत्तरीय तपासणीकरिता पाठवून दिला.विशेष म्हणजे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी देखील त्यांच्या  परीने  तपास  सुरू  केला  आहे.  ही  घटना  उघडकीस  आल्यानंतर  पोलिसांकडून  स्टेशन   परिसरातील  सीसीटीव्ही तपासण्यात आले.