Fri, Sep 25, 2020 11:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धडकने लगा दिल, नजर झुक गई; कभी उन से जब 'सामना' हो गया!

धडकने लगा दिल, नजर झुक गई; कभी उन से जब 'सामना' हो गया!

Last Updated: May 23 2020 3:36PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

राज्यात कोरोनाच्या संकटात राजकारण चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (ता.२३) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीचे कारण विचारले असता राऊतांनी सचिच्छा भेट असल्याचे सांगितले. या भेटीवर भाजपने राऊत आणि राज्यपालांच्या भेटीचा फोटो शेअर करत राऊतांना टोला दिला आहे. 

यांनी भेटीदरम्यानचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. शेअर करत असताना, ''माझ्यापेक्षा हे थोर आहेत त्यामुळे त्यांना माझा नमस्कार. भेटीदरम्यान आमच्यात चांगला संवाद झाला. काळजी करून नका आमच्या महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंचे सरकार ठीक सुरू आहे. असे राज्यपालांना सांगितले असल्याचे राऊत यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

राऊत यांचा भेटीदरम्यानचा हाच फोटो ट्विट करत भाजप महाराष्ट्रने ''धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब 'सामना' हो गया '' अशी खोचक कॅप्शन दिली आहे.  भाजप महाराष्ट्रच्या या ट्विटला राऊतांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

 "