Thu, Aug 13, 2020 17:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'सरकारी यंत्रणेचा समन्वय कुठेही दिसत नाही'

'सरकारी यंत्रणेचा समन्वय कुठेही दिसत नाही'

Last Updated: Jul 06 2020 3:04PM
ठाणे: पुढारी ऑनलाईन

राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये इतर शहरांपेक्षा कोरोना महामारीची परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसापासून  मुंबई, पनवेल दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संदर्भात परिस्थितीविषयी माहिती दिली. तसेच कोरोनाची चाचणी करण्यात महाराष्ट्र राज्य १० व्या क्रमांकावर असल्याचा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

फडणवीस यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मांडलेले मुद्दे

मुंबई साडेचार हजार चाचण्या करण्यात येत आहेत

मुंबई, एमएमआर क्षेत्रात राज्यातले ७० टक्के कोरोनामुळे मृत्यू

ठाण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

सरकारी यंत्रणेचा समन्वय कुठेही दिसत नाही

कुठल्याही परिस्थितीत अहवाल २४ तासात यायला हवा

कोरना चाचणी केल्यास अहवाल येण्यास विलंब

राज्य सरकरने महापालिकांना पैसा पुरवला पाहिजे

पालिकेकडे सुविधांसाठी निधी नाही

आयसीयू, व्हेंटिलेटरचा मोठा प्रश्न

लॉकडाऊन उठवल्यानंतर मृत्यूदर २०-२५ टक्क्यांनी जास्त

पनवेलमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता

टेस्ट करण्यामध्ये महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर

राज्यात टेस्टिंगची संख्या वाढवण्याची गरज

आरोग्य विषयक सर्व प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार

खासगी रूग्णालय अव्वाच्यासव्वा बिल आकारत आहेत

संसर्ग रोखण्यासाठी नियोजनावर भर देण्याची गरज

महाविकासआघाडी सरकारमध्ये अविश्वासाचे वातावरण

म्हणून मुख्यमंत्र्यांनी बदल्यांना स्थगिती दिली

पोलिस उपयुक्तांच्या बदल्यांची माहिती कदाचीत मुख्यमंत्र्यांना नव्हती

मराठा आरक्षण प्रश्नाकडे अधिक लक्ष देण्याची गरज