Tue, Aug 04, 2020 14:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारचं प्राधान्य नेमकं कशाला? फडणवीसांचा सरकारला सवाल

सरकारचं प्राधान्य नेमकं कशाला? फडणवीसांचा सरकारला सवाल

Last Updated: Jul 04 2020 3:04PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने 5 वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचं प्राधान्य नेमक कशाला आहे? असा सवाल केला आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या पनवेल आणि नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी कोविड रूग्णालयाची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केल. यावेळी त्यांनी संकटाच्या काळात सरकारच्या वाहन खरेदीच्या निर्णयावर निशाणा साधला. 

कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने 5 वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी इनोव्हा क्रिस्टा ही २२ लाख ८३ हजार रु. किमतीची कार खरेदी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांना कार्यालयीन वापराकरिता शासकीय वाहन आवश्यक असल्याने विशेष बाब म्हणून वाहन खरेदी करण्यास वित्त विभागाच्या राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने तसेच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत फडणवीस यांनी वाहन खरेदी ही सरकारची प्राथमिकता असू शकत नाही असे स्पष्ट सांगत सरकारच प्राधान्य नेमक कशाला आहे? असा सवाल केला आहे.