किरीट सोमय्यांची धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Last Updated: Jan 13 2021 8:35PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बलात्काराचे आरोप झाल्याने त्यांची राजकीय अडचण वाढली आहे. त्यांच्याविरोधात भाजप नेते किरिट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ही तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. (complaint against Minister dhananjay munde to election commision of India for Non Disclosure Concealment of Facts about Wives Children & Properties) 

अधिक वाचा : 'धनंजय मुंडेंवरील शोषणाचे आरोप पाहता मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही'

धनजंय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नी, मलं आणि संपत्तीबाबत माहिती न दिल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे.  दुसरीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. या संदर्भात त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हे आपले ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही टॅग केले आहे.

अधिक वाचा : 'जोपर्यंत सरकार विधेयक मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी आपलं आंदोलन सुरूच ठेवतील'

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्याबद्दल तत्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावरील शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे. 

अधिक वाचा : 'आपला नाकर्तेपणा लपवायचा आणि केंद्राला बोलायचे ही राज्य सरकारची पद्धत'

ते पुढे म्हणतात की, भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि आम्ही आता या विषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. 

अधिक वाचा : गणेश नाईक -मंदा म्हात्रेंचे शीतयुद्ध थांबणार? आशीष शेलार नवी मुंबईत

मात्र, गेंड्याच्या कातडीचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. पण तरीही मुंडे यांने या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे, अशीही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या प्रकरणी भाजपच्या वतीने आम्ही राज्यभर आंदोलन करणार असल्याचाही त्यांनी इशारा दिलाय.