Tue, Jun 15, 2021 13:02
माझी दोस्ती पिंजऱ्यातील नव्‍हे जंगलातील वाघाशी : चंद्रकांत पाटीलांचा संजय राऊतांवर पलटवार

Last Updated: Jun 10 2021 3:38PM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमीत्त त्यांना विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यामध्ये संजय राऊत यांनी आपल्या शैलीत चंद्रकांत पाटील यांना टोमणा मारत शुभेच्छा दिल्या. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनीही संजय राऊत यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे. 'आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे', असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

अधिक वाचा : तर वाघाशी दोस्ती करायला कधीही तयार; ठाकरे- मोदी भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना मला गोड म्हणत शुभेच्छा दिल्या. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यकर्त्याने वाघ भेट दिला.  

अधिक वाचा : मला महाराष्ट्राची आणि राष्ट्रवादीच्या भवितव्याची चिंता वाटत नाही : शरद पवार (video)

यावेळी मी म्हणालो माझी वाघाशी दोस्ती आहे. मी म्हटले आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

अधिक वाचा : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनात शरद पवारांकडून शिवसेनेचं कौतुक! (video)

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना जन्मदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. यावेळी, चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात वाघावरून  खोचक टीका केली होती. या विधानावरून चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांनी अशाच कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहिल्‍या पाहिजेत. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची, असे संजय राऊत म्हणाले होते.