Tue, Aug 04, 2020 13:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'राजगृह' हल्ला; आरोपींना तात्काळ अटक करा, फडणवीसांची मागणी

'राजगृह' हल्ला; आरोपींना तात्काळ अटक करा, फडणवीसांची मागणी

Last Updated: Jul 08 2020 10:06AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर काल (ता.७) दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर राज्यभरात या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला असून आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकर यांच्याशी फोनवर चर्चा केली असल्याचेही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, अतिरिक्त पोलिस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर काल (ता.७) दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोडही केली आहे. घराच्या काचांवरही दगडफेक करण्यात आली आहे. यात घरातील कुंड्यांही फोडण्यात आल्या आहेत. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.