Thu, Sep 24, 2020 10:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'चव्हाणांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड'

'चव्हाणांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड'

Last Updated: Jan 20 2020 1:31PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काँग्रेसने त्यावेळीच तत्काळ हा प्रस्ताव धुडकावून लावला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर रोख धरत चव्हाणांच्या वक्तव्यामुळे सेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका केली आहे. 

चव्हाण यांच्या वक्तव्यासंबंधी बोलताना फडणवीस म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतले पाहिजे. जर २०१४ ला सुद्धा शिवसेना काँग्रेससोबत जायला तयार होती, तर ते आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले हाेते चव्हाण वाचा सविस्तर►'शिवसेनेचा २०१४ मध्येच काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव'

चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याचे फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच, विचारधारा, तत्वं, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का ? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळे आहे का? असे सवाल करत यासर्व गोष्टीचा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे, अशी मागणीदेखील फडणवीस यांनी यावेळी केली. 

 "