Mon, Jul 06, 2020 11:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव ठाकरेंनी अयोध्येचे श्रेय 'त्या' सर्व नेत्यांना दिले, पण भाजपचे नाव घेणे टाळले! 

उद्धव ठाकरेंनी अयोध्येचे श्रेय 'त्या' सर्व नेत्यांना दिले, पण भाजपचे नाव घेणे टाळले! 

Last Updated: Nov 09 2019 6:02PM

उद्धव ठाकरेपुढारी ऑनलाईन डेस्क 
 

हिंदू आणि हिंदुत्व हा नाही म्हटल, तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा गाभा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज (ता.०९) अयोध्येतील रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना ती रामलल्ला विराजमानची असल्यावर शिक्कामोर्तब केले. मुस्लिमांना अयोध्येमध्येच महत्त्वाच्या ठिकाणी ५ एकर जागा देण्याचे आदेश दिले आहेत. 

या निर्णयानंतर शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. आजचा दिवस सोन्याच्या अक्षराने लिहून ठेवण्याचा दिवस असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी उद्धव यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राम मंदिरातील लढ्यातील सर्वच नेत्यांची नावे घेतली, पण त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव घेण्याचे कटाक्षाने टाळल्याने चांगलीच चर्चा रंगली.

तोंडी हिंदूत्व मानणारे पक्ष नको आहेत, तर आचरणात आणणारे पक्ष हवे आहेत असे सांगत पुन्हा भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी संघटनांचा उल्लेख करताना विश्व हिंदू परिषद आणि आरएसएस यांचाही पक्ष म्हणून उल्लेख केला, पण भाजपचा उल्लेख टाळलाच. त्यांनी राम मंदिराच्या अनुषंगाने मते मांडली, पण भाजपचा उल्लेख केलाच नाही. अडवाणी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या अशोक सिंगल, तसेच अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदींची आदींचा प्राधान्याने उल्लेख केला, पण त्यांनी भाजपचे नाव कुठचं घेतल नाही. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा विकोपाला गेला आहे. दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. 

उद्धव ठाकरे म्हणाले... 

राम मंदिरासाठी जे शहीद झाले त्या सर्वांसमोर मी नतमस्तक 

आंदोलनात सहभागी झालेले काहीजण अजुनही आमच्यासोबत आहेत, त्या सर्वांना मानाचा मुजरा

अशोक सिंघल, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांचीही आठवण होते.

लवकरच लालकृष्ण अडवाणींची भेट घेणार, राम मंदिराच्या लढ्यात अडवाणींचे मोठे योगदान

येत्या 24 तारखेला मी पुन्हा अयोध्येला जाईन. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते

आपल्या देशात मी हिंदू आहे हे बोलायला घाबरत होते, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी ते बळ त्यांना दिलं