Sat, Sep 19, 2020 07:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक रिक्षा अशीही! आनंद महिंद्राही झाले फिदा!

एक रिक्षा अशीही! आनंद महिंद्राही झाले फिदा!

Last Updated: Jul 12 2020 7:37PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

सद्या सोशल मीडियावर एका भन्नाट रिक्षाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या रिक्षाचा व्हिडिओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. ते त्यांच्या चाहत्यांना ट्विटरवर लगेच रिप्लाय देतात. हा व्हिडिओ एका रिक्षाचा आहे, ज्यात वायफाय, हँड वॉश, बेसिन, सॅनिटायझर आणि आणि कोरड्या कचर्‍यासाठी व ओल्या कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन आहेत.

वाचा : राजभवनात कोरोनाची एन्ट्री; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केला स्पष्ट खुलासा!

हा रिक्षाचा व्हिडिओ शेअर करत असे लिहीले आहे की, कोविड १९ ने स्वच्छ भारत अभियानला प्रोत्साहन दिले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख ३१ हजार झाली आहे. अशावेळी सोशल डिस्टसिंग, मास्क, साफ सफाई, आणि वारंवार हात धुणे हे करुनच कोरोनापासून वाचू शकतो. असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे. 

हा व्हिडिओ महिंद्रा यांनी १० जुलै रोजी ट्विट केला आहे. ट्विट केल्यानंतर काही वेळातच ३१ हजाराहून अधिक लाईक्स आणि ५ हजाराहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांनी रिक्षाचे कौतुक केले आहे. 

वाचा : 'एन्काउंटर करतील हवाई मार्गेच कानपूरला न्या' (video)

 

 "