Sun, Sep 20, 2020 04:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण : कमलेश कदम यांच्यासह ६ जणांना जामीन मंजूर

शिवसेनेच्या शाखा प्रमुखासह ६ जणांना जामीन

Last Updated: Sep 12 2020 1:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी दि. ११ रोजी सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर कमलेश कदम यांच्यासह ६ जणांना जामीन मंजूर कऱण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचा शाखा प्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश होता. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला कांदिवली पश्चिम येथे  मारहाण करण्यात आल्यानंतर त्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनवेर टीका केली होती. 

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम आणि कार्यकर्ता संजय मांजरे यांचा समावेश आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे एक कार्टून शेअर केल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला. याप्रकरणी कमलेश कदम आणि संजय मांजरे यांना अटक करण्यात आली.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज ट्विटरवर शेअर केलं होतं. 

 "