मुंबई : पुढारी ऑनलाईन
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असतात. त्या विविध विषय घेवून गाणं सादर करतात. सोशल मीडियात या गाण्यांची जोरदार चर्चा होते. अनेकवेळा त्यांना नेटक-यांच्या ट्रोलिंगचा सामना करवा लागतो. पण मिसेस फडणवीस अशा ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात. आता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाट्य गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
अमृता फडणवीस यांचं 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे ८ मार्च रोजी महिला दिनी प्रदर्शित झालं आहे. मिसेस फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकौंटरवरून हे गाणं प्रेक्षकांसाठी शेअर केलं आहे. अल्पावधीतच त्याला पसंती मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी अमृता यांनी आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता. जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला - कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.... तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी!" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं.