Thu, Aug 13, 2020 16:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिग बींच्या प्रकृतीत सुधारणा

बिग बींच्या प्रकृतीत सुधारणा

Last Updated: Jul 15 2020 5:24PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कोरोनाने संक्रमित आहेत. नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रूग्णालयात असतानादेखील त्यांनी आपला दिनक्रम मोडला नाही. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपले लिखाण सुरू ठेवले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

कधी देशभरातून चाहत्यांकडून मिळत असलेल्या प्रेमाचे, शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त केले आहेत. बिग बींनी रुग्णालयातून सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे. ही कविता व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "श्वेत वर्ण आभूषण, सेवा भाव समर्पण, ईश्वर रूपी देवता ये, पीड़ितों के संबल ये, स्वयं को मिटा दिया, गले हमें लगा लिया, पूजा दर्शन के स्थान ये, परचम इंसानियत के।" 

फॅन्सचे म्हणणे आहे की, बिग बींची ही पोस्ट हे वाचून असं वाटत आहे की, त्यांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत.  

याआधी बिग बींनी देशभरातून मिळालेल्या प्रार्थनांसाठी आभार व्यक्त करत पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिलं होतं, "प्रार्थना, सद भावनाओं की मूसलाधार बारिश ने, स्नेह रूपी बंधन का बांध तोड़ दिया है; बह गया, स्थिर रह ना पाया, तर कर दिया मुझे इस अपार प्यार ने, मेरे इस एकाकी पन के अंधेरे को जो तुमने प्रज्वलित कर दिया है, व्यक्त न कर पाउँगा व्यक्तिगत आभार , बस, नत मस्तक हूँ मैं"

अमिताभ बच्चन यांनी स्वत: सोशल मीडियावरून कोरोनाचे संक्रमण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर अभिषेक बच्चननेदेखील ट्विटरवरून सांगितले होते की, त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ऐश्वर्या राय आणि आराध्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.